महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं  अत्यंत महत्त्वाची माहिती देत दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची  तारीख जाहीर केली आहे.

गुरुवारी म्हणजेच 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.

निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद  होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये  8,44,116 मुलं आणि 7,33,067 मुलींचा समावेश आहे.

सहसा दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. पण,  यंदाच्या वर्षी मात्र बारावीच्या मागोमाग दहावीचेही निकाल लागलीच जाहीर  केले जाणार आहेत.

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी. – त्यानंतर होमपेजवर असणाऱ्या  Maharashtra SSC result च्या लिंकवर क्लिक करावं.